सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर

जिल्ह्यातील कार्यालयात शुकशुकात

जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी या आधी मार्च महिन्यात संपावर गेले होते. मागण्या मान्य न झाल्याने विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. गुरुवार (दि. 14) पासून या संपाला सुरुवात झाली आहे. या संपात जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती आदींनी सहभाग नोंदविला आहे.


महाड तहसील कार्यालयावर मोर्चा

महाड : 1982 च्या जुन्या पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून यासह अन्य प्रलंबित 17 मागण्यांसाठी गुरुवारी महाड शहरात शासनाच्या विविध विभागांच्या कर्मचारीने मोर्चाचे आयोजन केले होते. चवदार तळे येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना चौकामध्ये पुष्प माला समर्पित करून बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयात संपन्न झाला यावेळी राज्य राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री भोनकर यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन करून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नसल्याचे निर्धार व्यक्त केला.

सुधागड तालुक्यात बेमुदत संप

पाली/बेणसे : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी करिता यापूर्वी देखील संप पुकारण्यात आला होता मात्र त्यानंतर देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य सरकारी व निम सरकारी शिक्षक कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेत बेमुदत संप पुकारला आहे. या संपात पाली सुधागडातील महसूल अधिकारी कर्मचारी, ग्रामविकास कर्मचारी, पंचायत समिती आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षक आदींनी जुनी पेन्शन व इतर 17 मागण्यांकरिता दि.14 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.पाली पंचायत समिती ते पाली तहसील कार्यालयापर्यंत सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांची रॅली निघाली.

या रॅलीत मध्यवर्ती सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत कशीनाथ इचके,ग्रामसेवक सुधागड तालुका अध्यक्ष मयूर प्रकाश कारखानीस, सुधागड तालुका तलाठी संघटना अध्यक्ष दत्तगुरु केरू सरनाईक,महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना अध्यक्ष अनंत परशुराम वरगुडे, कृषी सहाय्यक सुधागड तालुका संघटना अध्यक्ष संभाजी भगवान खिलारे, महाराष्ट्र औषधं निर्माण अधिकारी संघटना सुधागड तालुका अध्यक्ष सुदेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने सरकारी व निम सरकारी कर्मचारी व शिक्षक या संपात सहभागी झाले होते.

पनवेल तहसील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पनवेल : जुनी पेन्शन योजना लागू करावी यश इतर मागण्यासाठी गुरुवारी पनवेल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन छेडले होते. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती यांच्यातर्फे हे आंदोलन छेडण्यात आले. एनपीएस हटवा, व ओपीएस लागू करा जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, रिक्त पदे कायमस्वरूपी भरा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिना अट करा, पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पाल्याना शासकीय सेवेत घ्या, शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करा व भादंवि संहिता कमळ 353 पूर्वी प्रमाणेच प्रभावी करा यावं इतर मागणीसाठी हे बेमुदत संप आंदोलन छेडण्यात आले होते. यात मोठया प्रमाणात कर्मचाहरी वृंद सहभागी झाले होते.

Exit mobile version