अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनवाढ करण्यास सरकार अनुकूल

कर्मचार्‍यांची पदयात्रा स्थगित
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात येईल व त्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सवातोपरी प्रयत्न करीन, असे स्पष्ट व ठोस आश्‍वासन महिला व बालविकास विभाग मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकास विभाग यानी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधीना दिले. या आश्‍वासनाचा विचार करून संघटनेने 20 जून 2022 पासून यवतमाळ ते अमरावती पदयात्रा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांना भरीव स्वरूपाची मानधनवाढ द्या त्यांना दरमहा अर्ध्या मानचनाएवढी पेन्शन या अशी अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी आहे. सध्या अंगणवाडी सेविकांना रु. 8300, मिनी सेविकांना रू. 5900 व मदतनिसांना 4450 मानधन मिळते. महागाई प्रचंड वाढत असताना सुध्दा त्यांच्या मानधनात महाराष्ट्र शासनाने काहीही वाढ केलेली नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी अत्यंत कमी मानधनावर काम केल्यामुळे त्या आपल्या सेवाकाळात मानधनातून काहीन बनत करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर म्हातारपणी उदरनिर्वाह करणे, औषधोपचार करणे अशक्य होते. म्हणून म्हातारपणी जगण्यासाठी त्यांना अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेन्शन देण्यात यावी, अशी अंगणवाडी कर्मचा-यांची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जो वचननामा जाहीर केला होता, त्यात अंगणवाडी कर्मचार्‍याना मानधनवाढ व त्यांच्या संचारातींमध्ये सुधारण्याचे वचन दिले होते. त्याबाबतीत महाराष्ट्र सरकारने वचनपुर्ती न केल्यामुळे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड संताप व प्रतचर झाला होता. महाराष्ट्र सरकार व मंत्री, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे आपल्या मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाड़ी कर्मचारी संघ व अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या संघटनातर्फे दि. 20 ते 25 जून या कालावधीत यवतमाळ ते अमरावती येथे महिला व बालविकास विभाग मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयावर 100 कि.मी. ची पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्‍वभूमीवर मंत्री, महिला व बालविकास विभाग यांनी सदर संघटनांच्या प्रतिनिधोना आज दि. 17.जून 2022 रोजी चर्चेकरीता बोलावले होते. या बैठकीत मानधनाचा प्रस्ताव व दरमहा अर्ध्या मानधनाएवढी दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्तावास वित्तावभागाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्याना आश्‍वासन दिले. त्याचप्रमाणे शिष्ठ मंडळाने नानाभाऊ पटोळे यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन वाद व दरमहा पेन्शनबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन शिष्ठमंडळाला दिले.

या बैठकीमध्ये महिला व बालविकास विभाग उपसचिव ठाकूर, रूबल अग्रवाल, एम. ए. पाटील, कॉ. निशा शिवरकर, राजेश सिंह, विजया सांगळे, माया पवार, हुकुमताई उसके, अरुणा आलोणे, चंदा लिंगनवार, ज्योती कुलकर्णी उपस्थित होते.

Exit mobile version