कर्जत येथील शासकीय विश्रामगृह बंद

कधीकाळी गजबजलेला परिसर
| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 1978 मध्ये बांधलेले शासकीय विश्रामगृहाला अवकळा आली आहे. गेली तीन वर्षे हे विश्रामगृह दुरुस्तीच्या नावाखाली बंद असून गेली अनेक वर्षे हे शासकीय विश्रामगृह दुरुस्तीच्या नावाखाली वापराविना आहे. दरम्यान, गुलमोहोर हे शासकीय विश्रामगृह दुरुस्तीची पंचवार्षिक योजना कधी संपुष्टात येणार असा प्रश्‍न विचारला जात आहे.
तालुक्याचे ठिकाण तेथे शासनाचे विश्रामगृह अशी संकल्पना आहे.त्यानुसार कर्जत तेथे 1978 मध्ये शासकीय विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या या विश्रामगृहाला गुलमोहर या वृक्षाचे नाव देण्यात आले होते. एक एकरचा मोठा विस्तीर्ण परिसर असलेल्या या विश्रामगृहात वापर रस्त्याच्या कडेला असल्याने शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या कडून निवडणूक काळात होत होता. मात्र गेली अनेक वर्षे विश्रामगृहाला दुरुस्तीच्या कामाने वेधले आहे. अनेक वर्षे दुरुस्तीची सुरु असलेली कामे संपत नाहीत आणि कधीकाळी गजबजलेले शासकीय विश्रामग्रह परिसरात आता शुकशुकाट दिसून येत आहे. त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हेच प्रामुख्याने जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात किमान पाच वेळा या विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले आहे.त्यात दुरुस्तीचे एक काम पूर्ण झाल्यावर वर्षे लोटण्याआधी काही महिन्यात पुन्हा त्याच विश्रमगृहाचे दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित केली जातात.
गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीच्या कामांची मालिका संपत नसल्याने या विश्रामगृहाच्या वापर बंद झाला आहे. त्यात या परिसरातील जुनी झाडे नामशेष झाली असून एवढ्या मोठ्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साधे उद्यान देखील विकसित केले गेले नाही. त्याचवेळी गवत आणि माती यांचा ढीग या विश्रमगृह परिसरात असल्याने तेथे कोणी फिरकत नाही.त्याचेवेळी 2019 पासून तर हे विश्रामगृह 100 टक्के बंद आहे. तेथे कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी आरक्षित केले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2019 पासून हे शासकीय विश्रामगृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे.त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षक यांना देखील हे शासकीय विश्रामगृह वापरण्यास नादुरुस्त असल्याने देण्यात आले नव्हते.मात्र एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या आधी दोन महिने हेच शासकीय विश्रामगृह निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी आरक्षित होते,पण लोकसभा आणि त्या पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आरक्षित ठेवण्यात आले नव्हते याचे आश्‍चर्य सर्वांना आहे.

Exit mobile version