शासन आपल्या दारी कार्यक्रमास म्हसळा तालुक्यातून प्रतिसाद


| म्हसळा | वार्ताहर |

माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास म्हसळा तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातून हजारो नागरिक, लाभार्थी या कार्यक्रमासाठी सकाळीच रवाना झाले. तहसीलदार समीर घारे, नगरपंचायत नगराध्यक्ष संजय कर्णिक, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, गटविकासअधिकारी बाळासाहेब भोगे, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे आदि मान्यवरांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे नागरिकांना कार्यक्रमासाठी वेळेत पोचण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातून एकूण 31 एसटीच्या सुविधा करण्यात आल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले. तालुक्यातून मेंदडी, वारळ, तुरुंबाडी, गोंडघर, आडी, कोळे, घूम, जांभूळ, म्हसळा, पाभरे, निगडी-कांदळवाडा, देवघर, कुडतुडी, खामगांव, कणघर, आंबेत खाडी किनारपट्टी इत्यादी गावातून नागरिक या कार्यक्रमासाठी गेले आहेत. या प्रसंगीतहसीलदार समीर घारे, गणेश तेलंगे, भाऊसाहेब भोगे, समीर बनकर, निवासी नायब तहसीलदार समीर घारे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, म्हसळा मंडळ अधिकारी उभारे, सलीम शहा, तलाठी माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version