विद्यार्थ्यांचा गुणगौरव, साहित्याचे वाटप

शिक्षणप्रेमी गितराज म्हस्के यांचा स्तुत्य उपक्रम

| खांब | वार्ताहर |

रोहा शहरातील हनुमान नगर येथील सन-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या 10 वी, 12 वी, पदवीधर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिक्षणप्रेमी गितराज म्हस्के यांच्या संकल्पनेतून व सहयोगाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सीमा सावंत, आदर्श शिक्षक व पत्रकार नंदकुमार मरवडे, जेष्ठ पत्रकार केशव म्हस्के, कृष्णा शिंदे, रमेश थळे, गोटिराम मालुसरे, दिपक शेडगे, धोंडीबा कदम, विनोद गावडे, प्रज्योती मयेकर, कला पवार, हेमा कांबळे, उमरठकर, लाड, मराठी व्यावसायिक योगिराज म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते अमित कासट, निखिल शिर्के आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या 10 वी सिध्दी उमरठकर, गौरव खामकर, 12 वी उत्तीर्ण प्रज्वल खामकर, पदवीधर यश केंडे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version