| अलिबाग | प्रतिनिधी |
लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थे-अंतर्गत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार केंद्रामध्ये इयत्ता 8 वी, 9वी, 10 वी, 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या-पुस्तके,दफ्तर,कंपासपेटी,चित्रकला वही व आलेख वही यासाहित्यांचा समावेश होता. या वर्षासाठी संस्थेने बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी अशा चार सेंटरमधून 296 मुलांची निवड केली असून त्या सर्वांना शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मिळून 559हून अधिकजण उपस्थित होते. वाटपकार्यक्रमात आर.डी.नाईक, फोकणे, पवार, अरुण धनावडे, हिराजी काष्टे गणेश धुमाळ, किसान वाघमार, गिरीश शेळके, प्रकाश खडप आदी मान्यवर उपस्थित होते.