नाईक महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा

। म्हसळा । प्रतिनिधी ।
वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे बॅ.अंतुले यांची जयंती आणि पदवीदान समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

म्हसळा मुस्लिम समाज अध्यक्ष अहमद अली पेनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पदवीदान समारंभास तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, मुख्यमंत्री ग्रामिण विकास अधिकारी सचिन निकम, सभापती छाया म्हात्रे, फझल हलदे, नसीर मिठागरे, गटशिक्षणाधिकारी मंगेश साळी, निलम वेटकोळी, हादेव पाटील, आहे. अ. रजाक मेमन, शकूर घनसार, बाबाजान पठाण, शौकत घरटकर, ए. आय. जे. चे प्राचार्य तांबे, सलाम हलदे, किशोर मोहिते, प्राचार्य एम. एस. जाधव, सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरुवातीस भारतरत्न स्वरसाम्रादनी लता मंगेशकर आणि शहरातील नामवंत इलेक्ट्रिशियन नाना करडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा.टेकळे यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य एम. एस. जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version