। म्हसळा । वार्ताहर ।
फेब्रुवारी 2022 मध्ये संपन्न झालेल्या म्हसळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून काँग्रेसच्या पाच प्रमुख पदाधिकार्यांचे निलंबन करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख, शहर अध्यक्ष बाबा हुर्जुक यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्या निर्देशाने काँग्रेसचे चिटणीस प्रमोद मोरे संघटन व प्रशासन यांनी फझल अहमद हलदे, विद्यमान नगरसेवक नासिर अ. रहिमान मिठागरे,नाझीम सैफुद्दिन चोगले, अब्दुल सलाम सिद्दीक हलदे, माजी नगरसेवक सुहेब अ.सलाम हलदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
नुकत्याच झालेल्या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवात वरील निलंबित केलेल्या पदाधिकारी यांचा मोठा हात असल्याचा आरोप तालुका व शहर काँग्रेसने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केला असता त्यांव्सरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाबा हुर्जुक यांनी दिली.