| आपटा | वार्ताहर |
आपटा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पाताळगंगा नदीच्या किनारी केलेली अतिक्रमणे व आपटा गावातील स्वच्छता आणि विविध विषयांवर चर्चा होऊन ग्रामसभा गाजली. पाताळगंगा नदी किनारी आपटा ग्रामंचायत हद्दीत काही जणांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. या बांधकामांना आपटा ग्रामपंचायतीने परवानगी दिली आहे का, याबाबत विचारणा करण्यात आली.
आपटा गावातील सार्वजनिक जागा तलावाच्या काठावर जी अतिक्रमणे होत आहेत, झाली आहेत, यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा पाढाच वाचला. घरपट्टी वेळेवर भरली जात नाही व ती नंतर लोक आदालतमध्ये जाऊन कमीत कमी भरली जाते, यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आता घरपट्टी भरली नाही तर आपटा ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची माहिती देणार नाही. गावातील तलाव स्वच्छ नाहीत, गाळ काढणे व भोवतालचा अतिक्रमण काढणे, कचरा भरणे, तलावात आजूबाजूच्या लोकांचे सांडपाणी सर्व तलावात येते. ही कामे करणे गरजेचे आहे. आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने अनेकदा ग्रामस्थांना पेण, अलीबाग येथे धावपळ करावी लागत आहे. यावेळी प्रभारी सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आपटा ग्रामस्थ, बालवाडी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.