श्री सदस्यांकडून 27 गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता अभियान कामोठे समिती यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील 27 गावांमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
15 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून ग्रामस्वच्छता अभियानात श्री सदस्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करून कचर्‍याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. नितळस, श्री मंगलवाडी, ब्राह्मण करवले, म्हात्रेपाडा, शेलारपाडा, पोसरी, कुंभार्ली, चिरड, पाली, बुर्दुल, विठ्ठलवाडी, नार्हेन, ऊसाटणे, आंबे-चिंचवली, कुत्तरपाडा, शिरवली, कानपोली, चिंध्रण, मोहोदर, चिंचवली, आंबे म्हाळून्गी, नेवाळी, कोळवाडी, वावंजे, खैरणे, वलप, पाले बुद्रुक या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्यातर्फे गेली अनेक वर्षे सातत्याने समाजसेवेचे कार्य सुरू आहे.

Exit mobile version