ग्रा.पं.निवडणूक! सोळा उमेदवारी अर्ज दाखल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 20 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.24) एकूण 16 अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर झाले. यामध्ये सदस्यपदांसाठी 13 तर थेट सरपंचपदासाठी 3 अर्जांचा समावेश आहे.

अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अलिबागमध्ये सदस्यपदासाठी 1, श्रीवर्धन 1, खालापूर सदस्यपदासाठी 8 तर सरपंचपदासाठी 2, पोलादपूर सदस्यपदासाठी 3 तर सरपंचपदासाठी 1 असे अर्ज सादर झाले आहेत. ही निवडणूक 13 ऑक्टोबरला होणार आहे. तर 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version