झोतिरपाडा शेतजुई येथे भव्य क्रिकेट सामने संपन्न

| शिहू | वार्ताहर |

नवतरुण मित्रमंडळ झोतिरपाडा शेतजुई यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार 12 जानेवारी ते रविवार दि.14 जानेवारी दरम्यान रिलायन्स टाऊनशिप येथील क्रिकेट मैदानावर मर्यादित षटकांचे भव्य क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक भाजपा युवा नेते प्रसाद भोईर यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 25,000 रुपये रायगड पोलीस सुनील पाटील, तृतीय क्रमांकाचे 15,000 रुपये जखमाता डेकोरेटर्स निखिल पाटील यांच्या वतीने देण्यात आले होते. या तीन दिवशीय क्रिकेट सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले शिवांश 11 हाशिवरे, द्वितीय क्रमांक जिजाऊ ड्रीम फाउंडेशन अलिबाग तर तृतीय क्रमांक बी. सी. सी. सारळ अलिबाग यांना मिळाला. सामनावीर शिवांश 11 हाशिवरे संघाच्या पिंट्या पाटील यांना तर उत्कृष्ट फलंदाज जिजाऊ ड्रीम फाउंडेशन अलिबाग संघाच्या मृणाल पाटील, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार यांना आकर्षक चषक, बॅट, टी शर्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version