। खारेपाट । वार्ताहर ।
श्री जोगेश्वरी माता क्रिडा मंडळ आवास आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आवास ग्रामपंचायतचे सरपंच अभिजीत राणे व माजी पंचायत समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रणजित राणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना रणजित राणे म्हणाले की, खेळाडूंच्या उन्नतीसाठी सहकार्य करू. तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचून त्यांची प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. तसेच उद्घाटन सोहळ्याला जोगेश्वरी माता क्रिडा मंडळ आवास राणे आळीत संघातील खेळाडू सोन्या म्हात्रे, अमोल राणे, ओमकार राणे, रणजित राणे, विराज राणे, राजेश राणे, अनिल साठे, अंतरेश भगत, रोहित राणे, संतोष राणे, राहुल घोडपडे यांनी उपस्थिती लावली होती.
आवास तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा
