| पनवेल | प्रतिनिधी |
सोन्या-चांदीचे दागिने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आपल्या आजीचा टॉवेलने गळा आवळून तिचा खून अल्पवयीन नातवाने केल्याची घटना पनवेल तालुक्यातील टावरवाडी ते धामणीकडे जाणार्या डोंगराळ पायवाटेच्या मालडुंगे गावाच्या हद्दीत घडली आहे.
जानकी कान्ह्या निरगुडा (74) या त्यांच्या राहत्या घरातून एकविरा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी प्रेमा खंडवी हिच्या धामणी येथील घरी टावरवाडी ते धामणीकडे जाणार्या डोंगराळ पायवाटेने जात असताना पायवाटेलगत असलेल्या झुडपात तीच्या अल्पवयीन नातवाने तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने टॉवलने तिचा गळा आवळून तिचा खून केला. याबाबतची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याला मिळताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. आनंद कांबळे, सपोनि अनिरुद्ध गिजे, पो.उपनि. हर्षल राजपूत, पो.उपनि. विष्णू टोणे, पो.उपनि. दिपक शेळके व गुन्हे शाखेच्या पथकाने सदर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.