माणगावात विकासकामांसाठी तीन कोटींचे अनुदान

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरातील विविध विकासकामांसाठी नगरविकास राज्यमंत्री यांच्या सहकार्याने व आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नांनी नगर विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. माणगाव शहराच्या विकासासाठी भरीव विकासनिधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर करून दिल्याने तसेच हा विकासनिधी माणगावकरांना ज्यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला ते आमदार भरत गोगावले यांचे माणगावतर्फे माजी जिल्हा परिषद सभापती अ‍ॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले व नगरसेवक, नगरसेविका यांनी आभार मानले आहेत. या तीन कोटी रुपयांच्या अनुदानाचे मंजुरी पत्र आ. गोगावले यांनी शनिवार, दि.7 मे रोजी सायंकाळी माणगाव नगरपंचायत कार्यालय येथे अ‍ॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक, नगरसेविका यांच्याकडे दिले.

Exit mobile version