एक दिवस गावासाठी अभियाना अंतर्गत स्मशानभुमी स्वच्छता

| कर्जत । वार्ताहर ।
एक दिवस गावासाठी अभियाना अंतर्गत (दि.2 ) ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने कर्जत शहरातील दहिवली गावामधील नवतरुण ओंकार गणेश मित्र मंडळाच्या संकल्पाने गावांमधील स्मशानभुमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजामध्ये जगत असताना समाजाचे आपण देणे लागतो ही जाणीव ठेवून सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी व प्रशासनाचे काम हलके करण्यासाठी एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज स्वच्छता हा विषय खूप ऐरणीचा झाला असून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण प्रत्येकाने स्वच्छता हा विषय उचलून धरणे गरजेचे आहे.

या भारत खंडाला या भारत भूमीला या भारत मातेला जर आपल्याला विश्‍वगुरू बनवायचे असेल तर स्वच्छता हा विषय अंगिकारणे खूप गरजेचे आहे. भारत खंड हा साधू संतांचीभूमी म्हणून ओळखला जातो,आणि जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य संतांच्या विचारांमध्ये आहे तरीही आपण या संतांचे विचार झोपासून हा वारसा पुढे नेण्याचे काम करूयात आणि आपल्या देशाला सुजलाम-सुफलाम बनवू या असा उपक्रम या मंडळाने कृतीच्या माध्यमातून दाखला आहे.

Exit mobile version