शेती कामासाठी बैलगाडीचे मोठे योगदान

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

पावसाचा जरी लपंडाव सुरु असला तरीसुद्धा पावसाच्या क्षणभर आगमन बळीराजासाठी मोठा दिलासा मिळत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहे. मात्र, या शेतीच्या कामामध्ये जास्त योगदान शेतकऱ्यांकडे असलेल्या बैल जोडीचे असते. बैलांचा शेतीची कामे करण्यासाठी मोठ्याप्रमाणात उपयोग होत असतो. तालुक्यातील बहुतांश शेतकरी बांधव पावसाळी भात लागवड करीत असतात. यामुळे आठ महिने धान्याचा तुटवडा भासत नाही. ज्या अल्प भुधारक शेतकरी वर्गांकडे बैल जोड्या नाहीत ते पेंढ्याची विक्री करून अर्थिक मदत मिळवित असतात. यामुळे शेती ही बळीराजासाठी मोठी पर्वणी भासत असते. वर्षाचे बारा महिने आपल्याजवळ असलेल्या बैलांना सांभाळून पावसाळ्यात त्यांचा वापर करण्यात येत असतो. अन्य कामासाठी बैल गाडीचा मोठा उपयोग होत असल्यांचे शेतकरी वर्गांचे मत आहे.

Exit mobile version