मंगळागौरी कार्यक्रमास महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
भारतीय संस्कृती आणि परंपरा अखंडपणे जपण्याचे काम मंगळागौरी सारख्या धार्मिक सणातुन होते असे प्रतिपादन मुरुड दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या महिला अध्यक्ष वासंती उमरोटकर यांनी केले. मंगळागौरीसारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमातून महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव व संधी मिळते असे ही उमरोटकर म्हणाल्या. प्रथम मंगळागौरीची षोडषोपचारपूजा अंकिता दांडेकर हिने केली. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व महिलांनी झिम्मा फुगडी, भेंडया, पारंपरिक खेळ नुत्यविष्काराच्या साथीने अत्यंत मंगलमय व उत्साह पुर्ण वातावरणात सुरवात करण्यात आली.

यावेळी वासंतीउमरोटकर, वृषाली धोत्रे, दिपश्री राजपुरकर,स्वाती दांडेकर, गायत्री चोडणेकर, भावना धोत्रे, शोभा पोतदार,राजपुरकर , करुणा कारेकर, उत्कृष्ट धोत्रे, श्रुतिका दांडेकर, प्रज्ञा उमरोटकर, श्रध्दा उमरोटकर, उत्कृषा दांडेकर, आदिंसह महिलावर्ग उपस्थित होते. वृषाली धोत्रे म्हणाल्या की श्रावण महिन्यात केले जाणारे मंगळागौरीचे व्रत महिलांसाठी उत्साह आणि आनंदाची पर्वणीच असते पारंपरिक वेशभूषा व अलंकाराचे लेणे परिधान करून नवविहितासंह महिला या कार्यक्रमात सहभागी होत असतात. महिलांनी नेहमी आनंदी व उत्साही राहावे. या बरोबरच महिलांनी जिवनात येणार्‍या अडिअडचणी व समस्यांना धैर्याने व आत्मविश्‍वासाने सामोरे जा प्रत्येक महिलेत काहीतरी वेगळेपण दडलेले असते त्या अंगभुत कलागुणांना महिलांनी स्वयंस्फूर्तीने वाव द्यावा व आपली सर्वांगिण प्रगती साधावी असे आवाहन धोत्रे यांनी केले.

Exit mobile version