। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे आरपीआय शाखेच्या वतीने रविवार दि. 10 जुलै रोजी आरोग्य शिबिर राबवण्यात आले. उल्हासनगर येथील सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून शिबिर राबवण्यात आले. डॉ. सुमन जैस्वाल, डॉ. चंदन झा, डॉ. महेंद्र सारंग, डॉ. स्नेहल ननवरे, डॉ. सोमनाथ चव्हाण आणि इतर कर्मचारी यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना सेवा दिली. या शिबिरामध्ये सुमारे 100 नागरिकांनी तपासणी करून घेतली यातील सहा रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी सूचना करण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बंधू अभंगे, अॅड. नवनीत साळवी, मारुती गायकवाड, राजेश गायकवाड,अमर जाधव,अरविंद मोरे, दीपक मोरे, अॅड. सुशील महाडिक, मनोज गायकवाड, किशोर जाधव, सुमित सुर्वे, संतोष जाधव, दीपक गायकवाड, अॅड. उत्तम गायकवाड, गायकवाड, मदन हिरे, मनोज गायकवाड, प्रशिक गायकवाड, शांताराम भोईर, प्रथम जाधव, सुजित गायकवाड, प्रमोद चव्हाण, विजय पवार, प्रकाश पवार, सनी भोईर, अजिंक्य हिरे, हरिचंद्र भोईर, जीवक गायकवाड, प्रणव गायकवाड, दिलीप दिवाकर आदी उपस्थित होते.