| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या शालेय स्पर्धेत पीएनपीच्या माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. पीएनपीच्या मुलांनी व मुलींनी वेगवेगळ्या क्रिडा स्पर्धेत सहभाग घेवून विजय संपादन केला व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या म्हसळा तालुक्यातील माध्यमिक शाळा पाष्टी या शाळेने तालुका स्तरावरील पावसाळी क्रिडास्पर्धेत कुस्ती या प्रकारात 14 वर्षे मुले (44 कि.ग्रॅ. वजनी गटात) सहभाग घेतला होता यामध्ये अंश अंकुश खामकर आठवीच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा बीड बु.कर्जत या शाळेच्या मुलांनी अभिनव शाळा कर्जत येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत वयोगट 14 (32 किलो वजनी गटात) समृद्धी शिवा लोभी हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच संस्कार संदीप रूठे वयोगट 14 (68 किलो वजनी गटात) प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरला.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची मुरुड तालुक्यातील माध्यमिक शाळा काकळघर शाळेच्या विद्यार्थिनींनी काकळघर शाळा विरुद्ध माध्यमिक शाळा यशवंतखार नांदगाव यांच्यात झालेल्या 17 वर्षे वयोगट मुली कबड्डीच्या सामन्यात काकळघर शाळेने 10 गुणांनी पराभव केला आणि प्रथम क्रमांक पटकाविला तर कबड्डी स्पर्धत 14 वर्ष वयोगट मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. मेहबूब हायस्कूल विहुर येथे झालेल्या हॉलीबॉल स्पर्धेत 14 आणि 17 या वयोगटात मुलींचे दोन्ही संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
जे.एस.एम. कॉलेज अलिबाग येथे पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पीएनपी होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीतील विद्यार्थिनी टिना चोहान व आसावरी पाटील विजेत्या ठरल्या व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. सर्व शाळांच्या यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच, बीड शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ गाडेकर क्रीडा शिक्षिका नीलम मिसाळ, पाष्टी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी, मुरुड काकळघर शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी मेहतर, होली चाईल्ड इंग्लिश मिडयम स्कूल वेश्वीच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, क्रिडा प्रशिक्षक अक्षय डाकी, शाळा समिती, स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांजकडून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.