पाकिस्तानची लालसा वाढली

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा; उत्पन्नाचा वाटा वाढविण्याची मागणी

| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप आयोजनावरून सुरू असलेला वाद काही केल्या शमन्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जरी हायब्रीड मॉडेलसाठी मान्य झालं असलं तरी आता त्यांना पैशाची हाव सुटली आहे. त्यांनी श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपच्या सामन्यांमधील उत्पन्नाचा अधिक वाटा मागितला आहे. युएईने गेल्या वर्षी आशिया कप आयोजनावेळी जेवढा बीसीसीआयआला उत्पन्नातील वाटा दिला होता. तेवढाच वाटा श्रीलंकेने पाकिस्तानला द्यावा अशी मागणी केली आहे.

पाकिस्तान जरी आशिया कप 2023 चा मूळ आयोजक असला तरी त्यांना फक्त त्यांच्या वाट्याला फक्त 4 सामनेच आले आहेत. श्रीलंका या स्पर्धेतील 9 सामने आयोजित करणार आहे. याचबरोबर अंतिम सामना आणि भारत – पाकिस्तान यांच्यातील दंबुला येथील दोन सामने देखील श्रीलंकेतच होणार आहेत. भारत – पाकिस्तान सामने हे सर्वाधिक जास्त उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे पाकिस्तान हा अधिक पैसे मिळावे यासाठी हटला आहे. पीसीबीमधील सूत्रांनी द न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, मपाकिस्तान आशिया कपचा आयोजक म्हणून फक्त काही सामनेच आयोजित करणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानला श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या सामन्यांमधून किती रक्कम मिळणार हे सर्वात महत्वाचे आहे.

Exit mobile version