नाना पाटील संकुलात आप्पासाहेबांना अभिवादन

| भाकरवड | वार्ताहर |
लोकशिक्षक क्रांतीयोद्धा नारायण नागू पाटील तथा आप्पासाहेब यांची 54वी पुण्यतिथी कोएसोच्या ना. ना. पाटील संकुलामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जि. प. सदस्या भावना पाटील, चित्राताई पाटील, पणतू अर्णव पाटील आदिंनी स्मारकातील स्व. ना. ना. पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी शाळा समिती सदस्य यशवंत पाटील,माजी सरपंच भूषण चवरकर , को. ए. सो. सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, संकुलप्रमुख डी. पी. कुलकर्णी, संकुलातील सर्व शाखाप्रमुख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार यांनीही स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या अर्ध पुतळ्यास विनम्रपणे अभिवादन केले.

Exit mobile version