। अलिबाग । वार्ताहर ।
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोहळ्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक अनुयायांनी, रहिवाशांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोरोनाच्या काळात दोन वर्षे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा योग न आल्याने अनेक अनुयायांनी रहिवाशांनी आपआपल्या कुटुंबासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा केली होती. पण यावर्षी शासनाने निर्बंध हटविल्याने रायगडात ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय अनुयायांनी घेतला होता. त्यानुसार रायगडात विविध कार्यक्रम, रॅली या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.