मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मेढेखार येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ रविवार दि.19 एप्रिल रोजी सायंकाळी 7.00 वाजता पिरबाबा मंदिराजवळ होणार आहे. हा सोहळा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

शिवछत्रपती मावळा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मेढेखार आयोजित हा कार्यक्रम अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पार पडणार आहे आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच, सुशोभीकरणदेखील केले जाणार आहे. या कामांचा भूमीपूजन सोहळा रविवारी सायंकाळी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version