| रायगड | जिल्हा परिषद |
आगरी सामाजिक संस्था अलिबाग आयोजित आध्यात्मिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.5) देहेन येथील हनुमानम मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह परिषदेचे अध्यक्ष साहित्यिक अमृत पाटील उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ही परिषद असणार आहे. दीप प्रज्ज्वलन, पुरस्कार वितरण, सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन हे पहिल्या सत्रात होणार आहे.त्यानंतर दुसऱ्या सत्रात आगरी बोलीचे बादशाह चंद्रकांत पाटील, डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन असणार आहे. या परिषदेच्या दरम्यान बिडवागळे येथील चंद्रकांत म्हात्रे, श्रीगावमधील मिरीग पाटील, हेमनगरमधील मच्छिंद्र पाटील, देहेन येथील शांताराम पाटील, कोळघर येथील शैलेश पाटील, कोपरमधील महेंद्र ठाकूर, चरी येथील गोरखनाथ पाटील, मेढेखार येथील विद्या म्हात्रे, कोळघर येथील वनिता पाटील, वायशेत येथील प्रमोद पाटील, आवेटी येथील सुनील म्हात्रे, कुर्डूसमधील धनाजी पिंगळे, देहेन येथील प्रमोद जुईकर, महेंद्र जुईकर, शशिकांत पाटील, नवीन देहेन येथील प्रल्हाद पाटील, अरुण पाटील, शहापूरमधील अमरनाथ भगत, राजमळा बामणोली येथील संतोष पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख ह.भ.प. जगन्नाथ महाराज राऊत असणार असल्याची माहिती आगरी सामाजिक संस्था अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी दिली.





