| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील खवली गावातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन निधीतून निधी मंजूर झाला आहे. यावेळी बोलताना सुरेश खैरे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत मी जो शब्द दिला होता, त्याचा आज प्रत्यक्ष साकार होत आहे. आजपर्यंत सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. भविष्यातही खवली ग्रामपंचायत हद्दीतील प्रलंबित असलेली कामे नक्कीच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही खैरे यांनी दिले. यावेळी सरपंच सुधीर केदारी, सदस्या गौरी चोगले, दिपाली चिले, पाली शहर महिला आघाडी ऋतुजा मेहता, अध्यक्ष सुभाष तटकरे, मंगेश तळकर, अमित घाटवळ, संजय चोगले, राजेंद्र तळकर, सिद्धी घाटवळ, काशिनाथ साबळे, चिंधू धुमाळ, संदीप कोळंबेकर, सुरेश जोशी, प्रतीक चिले, नंदन साबळे, मानसी बांडागले, मयुरी घाटवळ, स्वाती तळकर, मेघा तळकर, रत्ना लाड, प्रतिभा नटे,भाग्यश्री दिवेकर, विनीत कर्णिक, यतीन पटेल, सुधीर साखरले, गोविंद लेंडी व इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
खवलीतील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन
