शाळांच्या सुट्टीचा निर्णय गट शिक्षणाधिकाऱ्यांना

| अलिबाग | प्रतिनिधी |
अतिवृष्टीच्या शक्यतेने शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार आता स्थानिक पातळीवर गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उप जिल्हाधिकारी संदशे शिर्के यांनी दिली. त्यामुळे आता शाळां बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची वाट पाहावी लागणार नाही.

गेल्या काही नऊ दिवसात सहा वेळा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रेड अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी सर्व परिस्थिती पाहून तसेच सर्व यंत्रणांचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहिर करण्याचा निर्णय घेत होते. स्थानिक पातळीवरुन अहवाल येई पर्यंत शाळा भरण्याची वेळ यायची त्यामुळे आयत्या वेळी शाळा बंद ठेवाव्या लागत असल्याने पालकांसह शाळांचीही चांगलीच तारांबळ उडत होती. जिल्हाधिकारी आदेश देण्यास उशिर करतात असा समज सर्वांचाच होत होता. परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याने आता गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे हे अधिकार देण्यात येणार असल्याचे शिर्के यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, तसेच याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना याबाबत माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version