नेरळच्या महिला गटाच्या पदार्थांना वाढती पसंती

कृषी प्रदर्शनात स्टॉल्सला प्रतिसाद
| नेरळ | प्रतिनिधी |
खारघर येथे सुरु असलेल्या जिल्हा कृषी प्रदर्शनास नेरळ येथील वैष्णवी महिला गटातर्फे तयार करण्यात आलेले विविध पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस पडू लागले आहेत. यामुळे या महिला गटाला एक नवी बाजारपेठ उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. निसर्गात तयार होणार्‍या फळांच्या रसापासून वेगवेगळी सरबत, मसाले, जाम,लोणचे यांची निर्मिती नेरळ येथील तरुण दाम्पत्य करीत आहे. 13वर्षापूर्वी आपल्या नोकरीच्या ठिकाणी मिळालेल्या 5000 रुपयांमधून वैष्णवी महिला उत्पादक यांची निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये विविध 68 प्रकारचे ज्यूस आणि ते देखील कोणत्याही प्रकारचा रासायनिक अर्क यांचा वापर न करता निर्माण केले आहेत. ,वैष्णवी महिला गट उत्पादककडून जाम, सरबते, मसाले,लोणचे असे असंख्य पदार्थ बनवले जात असून यांच्या स्टॉलला कामोठे येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नेरळ गावात राहणारे क्षीरसागर हे अंबरनाथ येथे फळांच्या अर्कापासून वेगवेगळ्या प्रकारचे जाम, सरबत,लोणचे यांचे बनविणार्‍या कारखान्यात काम करायचे. परंतु त्या कारखान्याचे मालकाने धंदा होत नाही म्हणून विनायक क्षीरसागर यांना कामावरून कमी केले. त्यावेळी त्या कारखान्यात त्यांना जेमतेम घर चालवता येईल एवढा पगार मिळत होता.त्यामुळे नोकरी गेल्यावर कर्जत तालुक्यात गॅस पाईपलाईन टाकली जात होती तेथे कडाव येथे रात्रपाळीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवली. तेथे एका महिन्याचा साडेसात हजार पगार मिळाल्यावर काम सोडले आणि त्या नोकरीच्या पहिल्या पगारातील 5000 रुपयांवर विनायक क्षीरसागर यांनी फळांच्या अर्कापासुन ज्यूस, सरबते,जॅम,लोणचे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.त्या व्यवसायासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरातील एका खोलीत आवश्यक मशिनरी उधारीवर आणून कच्चा माल उपलब्ध करून घेत व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. 2010 मध्ये पायरमाळ भागात व्यवसाय सुरू केल्यावर प्रसंगी कल्याण किंवा नवी मुंबई येथील फळ मार्केट जावून दररोजची विकली न गेलेली फळे गोळा करून आणू लागले. विनायक क्षीरसागर यांच्या मदतीला त्यांची पत्नी संध्या आणि आजूबाजूच्या चार महिला यांनी या रोजगार निर्मितीत सहभाग घेतला.त्यावेळी 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर क्षीरसागर दाम्पत्याने ज्यूस,जॅम, सरबत, मसाले,लोणचे यांचे तब्बल 68 प्रकारचे उत्पादन तयार केले आहे.नेरळ, कल्याण, उल्हासनगर, पनवेल, आणि ठाणे येथे त्यांच्या वैष्णवी महिला गत उत्पादक संस्थेची उत्पादने उपलब्ध असतात.ठाणे येथे त्यांच्याकडे स्टॉल उपलब्ध असून त्या ठिकाणी देखील विक्री चालते.

वैष्णवी महिला गट उत्पादक यांच्याकडून जाममध्ये गुलकंद, मँगो मार्रा, मँगो जॅम, आवळा जॅम,किवी जाम,अननस फोडीचे जॅम,मिक्स जॅम आणि अंजीर जॅम तयार केले जातात.तर मसाल्यांमध्ये व्हेज कोबी मंचुरियन,पावभाजी तयार मसाला,चिकन तंदुरी,चिकन मंचुरियन मसाले,तर चटणी मध्ये खजूर चटणी,गोड लिंबाची चटणी, मिक्स चटणी, शेवताण चटणी,शेजवान चटणी यांची निर्मिती केली जाते.तर लोणचे मध्ये कारल्याचे लोणचे,आंबा लोणचे,कैरी,ओली हळद लोणचे,आंबे हळद लोणचे,तर ठेचा मध्ये कैरी ठेचा,मोड आलेले मेथी यांचा ठेचा कोल्हापुरी ठेचा यांचा समावेश आहे. सरबतामध्ये आवळा -आलू, पेरू, ब्लू कोरॉको, माजिटो,सोप,आवळा,बेल, रोझ, केशर अर्क, कोकम, कैरी पन्हे, आले पाचक,अननस,खस सिरप, काला खट्टा,लिंबू,आवळा – लिंबू,आंबे हळदी,कॉफी सिरप, बटर स्कोच आणि जिरा सरबत असे प्रकारचे सरबतचे अनेक प्रकार तसेच पाणी पुरीचे तयार पाणी यासोबत फालूदा फुल्फी मिक्स हे देखील त्यांच्या कडे उपलब्ध आहे.

आरोग्यदायी पदार्थ
रासायनिक पदार्थांचा कोणताही वापर नसल्याने वैष्णवी महिला गट उत्पादक यांच्या कडील उत्पादने यांना मोठी मागणी आहे.निसर्गातील सर्व फळे यांच्या अर्कापासून हे उत्पादन तयारी केलेली असल्याने आरोग्यास कोणताही उपाय होत नाही.त्यामुळे अशा महिला गट उत्पादक यांना अर्थ सहाय्य करण्याचा निर्णय कृषी विभाग यांच्याकडून घेण्यात आला आहे.त्यात रासायनिक घटक आणि द्रव्य यांचे कोणतेही मिश्रण नसल्याचे सिद्ध झाल्याने गेल्या दहा वर्षात या महिला गट उत्पादक यांची उत्पादने सर्वांच्या पसंतीची ठरत आहेत.

मुंबईकरांची पहिली पसंती
कृषी प्रदर्शनात मोठी गर्दी वैष्णवी महिला गटाच्या स्टॉल वर दिसून येत असून या गटाच्या महिला आणि क्षीरसागर दांपत्य यांच्याकडून सर्वांना या उत्पादने यांची माहिती देवून टेस्ट घेण्यासाठी आग्रह धरला जात आहे.त्याचवेळी नवी मुंबई मधील उच्चभु आणि नोकरदार यांची पावले कृषी प्रदर्शनात वळली असून महिला गटाच्या उत्पादन असलेले सिरप,लोणचे,मसाल्याचे पदार्थ आणि जॅम यांच्याकडे ओढा दिसून येत आहे.

Exit mobile version