| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ मोठया उत्साहात झाला असून त्यांच्या प्रचारासाठी मोठया प्रमाणात मुस्लीम बांधव व भगिनी रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. पेण शहरामध्ये कोल्हटकर वाडयातील गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून महावीर मार्ग, मिर्ची गल्ली, नंदीमाळनाका या भागांमध्ये प्रचार करण्यात आला. प्रचारासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, यांच्या प्रमुख पदाधिकार्यांसह खान मोहल्ल्यातील मुस्लीम बंधू भगिनी मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एकच घोषणा केली ती म्हणजे ‘गीते को जिताव, संविधान बचाव’.
या प्रचार रॅलीमध्ये काँग्रेसचे तालुका प्रमुख अशोक मोकल, शिवसेनेचे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, काँग्रेस शहर प्रमुख प्रविण पाटील, शिवसेना शहर प्रमुख मुयेरश चाचड, शिशिर धारकर, जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, छाया काईनकर, वैशाली समेळ, राष्ट्रवादीचे स्वरूप घोसाळकर, अलिना हिना, कागदी, खान, यांच्यासह मोठया प्रमाणात पेणकर सहभागी झाले होते.







