| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे गुरुवारी (13 ऑक्टोबर) अलिबागच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन व विकास समिती रायगड बैठक आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय दुपारी 1 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे डोंगरी विकास समिती बैठकही होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी 3:15 वाजता जिल्हा नियोजन समिती रायगड, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हिराकोट तलाव येथे रिटनिंग वॉलचे बांधकाम करणे, रेलिंग बसविणे तसेच उद्यान विकसित करणे या कामाचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.