| उरण | वार्ताहर |
जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि पंचायत समिती उरण च्या माध्यमातून अंगणवाडीचे उदघाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उरण तालुक्यातील मुळेखंड फाटा करंजा रोड येथ उरण माजी सभापती ऍड. सागर कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आई वडिलांच्या प्रित्यर्थ स्वखर्चाने मुळेखंड येथे जेष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्र हॉल चे काम करण्यात आले आहे अंगणवाडीचे उदघाटन महिला आघाडी सीमा घरत यांच्या हस्ते तर विरंगुळा हॉल चे उदघाटन तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद घरत.. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी.मुळेखंड गावाचे आजी माजी अध्यक्ष.. ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र म्हात्रे. कामगार नेते अनंत घरत. पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.