दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

। पनवेल । वार्ताहर।
इयत्ता 10 वी च्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा – कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर टॉक या विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर पनवेल यांच्या हस्ते संपन्न झाले. मनीषा पवार, सिताराम मोहिते, श्रीकांत शिनगारे, चंद्रकांत मुंडे , युवराज भोसले, दयानंद शिनगारे आणि विनोद घोरपडे यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

यावेळी मनीषा पवार, डॉ. दीपक माळी ,श्रीकांत शिनगारे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधी व परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर समुपदेशक चंद्रकांत मुंढे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यानंतर कला शाखेतील करिअर संधी या विषयावर समुपदेशक युवराज भोसले यांनी खूपच छान अशी माहिती दिली. आणि वैद्यकीय शाखेतील विविध करिअर संधी तसेच ललित कला क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर समुपदेशक दयानंद शिनगारे यांनी विशेष माहिती दिली.

ताण-तणाव व्यवस्थापन व अभ्यास कौशल्य या विषयाच्या अनुषंगाने विनोद घोरपडे विषय सहाय्यक तथा समुपदेशक प्रादेशिक विद्या प्राधिक मुंबई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी स्वतः तयार केलेला महाकरिअर पोर्टल विद्यार्थी लॉगिन संदर्भातील एक माहितीपूर्ण व्हिडिओ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. कार्यशाळेसाठी शीतल अस्वले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्र संचालन विनोद घोरपडे यांनी केले.

Exit mobile version