| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी विभागाची कन्या मनीषा गजानन पवार हिने एक मिनिट 24 सेकंदात 18 सूर्यनमस्कार करून नवा विक्रम रचला आहे. या आधीचा विक्रम एक मिनिट 26 सेकंदात 16 सूर्यनमस्कार करण्यात आला होता. मनीषा या उत्तम योग प्रशिक्षक असून त्यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांनी आपले यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले असून माझ्या पतीने दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले.