पोलिस रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

| पनवेल । प्रतिनिधी ।

पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून 02 जानेवारी ते 08 जानेवारी 2024 दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाना पनवेल तालुका क्रिडा संकुल येथे हुदा इंग्लिश स्कूल, पटेल मोहल्ला पनवेल या शाळेमधील विद्यार्थी-शिक्षकांना शस्त्र तसेच अमली पदार्थ दुष्परिणाम, वाहतुक नियम यांसारख्या विषयांवर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमास 100-125 विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने रेझिंग डे साजरा केला जात आहे.

Exit mobile version