शाळेतील मुलांना योग्य – अयोग्य स्पर्शांचे मार्गदर्शन

| अलिबाग । वार्ताहर ।

आदर्श शाळा वायशेत येथे योग्य-अयोग्य स्पर्शांचे मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी योग्य आणि अयोग्य फरकांबद्दल बोलणे अत्यावश्यक आहे. लैंगिक विकास, लैंगिक ओळख आणि इतर संबंधित विषयांबद्दल मुलांशी बोलणे देखील आवश्यक आहे. मुले जसजसे मोठे होतात तसतसे त्यांना या शरीराचे अवयव, त्यांची कार्ये, सुरक्षितता आणि गोपनीयता आणि खासगी भाग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

सामान्य लैंगिक वर्तन आणि समस्या दर्शविणारी वर्तणूक यांच्यातील फरक समजणे महत्त्वाचे आहे. हे सामान्य आहे आणि सामान्यत: वयाच्या पाच वर्षापासून दहा वर्षांपर्यंत लहान वयात सुरू केले जाऊ शकते. मुलाला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यासारख्या संकल्पनांची माहिती व पोक्सो कायदा अंतर्गत विविध माहिती, बाल विवाह प्रतिबंधात्मक कायदे, बाल कामगार विरोधी कायदा यासारख्या विविध बाबी गोष्टी रूप व साभिनय स्पष्ट केल्या. त्या अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रध्दा पाडगे, संदीप वारगे, डॉ. अ‍ॅड. निहा. राऊत लायन्स क्लब ऑफ श्रीबागच्या माजी अध्यक्षा यानी मार्गदशन केले.

या कार्यक्रमाला रमाकांत पाटील केंद्रप्रमुख केंद्र वायशेत, निकीता पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, निवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, लायन्स सदस्य रेश्मा वारगे, महिला शिक्षिका व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. शाळेतील विद्यार्थीनी आदिता, सानिका, मोनिका, बबिता यांनी स्वतःहून कार्यक्रमाविषयी उत्स्फूर्त अभिप्राय दिला. श्रीकांत पाटील यांनी रस्त्याने चालताना घ्यावयाची काळजी व अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नये यासारखी उपयुक्त माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वारगे यानी केले. तर श्रध्दा पाडगे यांनी आभार मानले.

Exit mobile version