रायझोबीयम बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

। अलिबाग । वार्ताहर ।
दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थींनीद्वारे पेझारी ग्रामस्थांना रायझोबीयम बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. आधुनिक जगात कृषीक्षेत्रानेही अद्यायावत होणे, आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून विविध प्रयोगाद्वारे यशस्वी संशोधन घडत असते, जे कृषिक्षेत्राला प्रगत करत असते.
आपण अर्जित करत असलेले कृषिसंबंधातील ज्ञान वैयक्तिक पातळीवर मर्यादीत न राहता, त्याचा फायदा स्थानिक पातळीवर व्हावा या उद्देशातून पेझारी ग्रामपरिसरात मार्गदर्शन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शिकणार्‍या ऐश्‍वर्या पाटील, श्रृती गावडे आणि असिया झोनबारकर यांनी रायझोबीयम बीज प्रक्रियांबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले.

Exit mobile version