| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संपन्न होत असलेल्या शारदोत्सव कार्यक्रमातंर्गत विद्यार्थी वर्गाला वाहतूक सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. एखाद्या अपघातामध्ये झालेले नुकसान कधीही भरून येत नसल्याने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मार्गदर्शन ए.पी.आय.अजित साबळे कोलाड पो.ठाणे यांनी व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक दिपक जगताप यांनी ए.पी.आय.अजित साबळे यांचे सर्वप्रथम यथोचित स्वागत केले.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना ए.पी.आय.अजित साबळे यांनी शालेय जीवनापासूनच विद्यार्थी वर्गाने वाहतुक सुरक्षेबाबत दक्ष राहून याबाबत प्रबोधन केले पाहिजे. याशिवाय शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थी वर्गाने मोबाईलचा वापर मर्यादित करावा. अशाप्रकारचे आवाहन शेवटी त्यांनी केले.