शेवगा शेतीबद्दल शेतकर्‍यांना मार्गदर्शन

| नेरळ | प्रतिनिधी |

शेतकर्‍यांसाठी तत्सम शेतीमधून चांगला नफा मिळतो हे शेतीमध्ये अनेक प्रयोग करून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेवगा, हळद, बटाटे, पपई आदी पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथे तालुक्यातील असंख्य शेतकरी यांनी मार्गदर्शन घेतले.

कर्जत तालुक्यातील राजकीय नेते आणि आता शेतीमध्ये आपल्या सहकारी शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी आघाडीवर असलेले पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी शेतकर्‍यांचे संघटन करण्यास सुरुवात केली आहे. बंधू पाटील यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात शेतीमधून नगदी पिके घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांनी आपल्या तालुक्यातील शेतकर्‍यांनी अल्पवधीत उत्पन्न मिळू शकते हे पटवून देण्यात येत आहे. त्यात शेवगा, पपई, हळद, बटाटे अशी पिके घेता येऊ शकतात आणि ही पिके कमी वेळेत उत्पादन देत असतात, असे शेतकर्‍यांना बैठकीत सांगितले. शेवगा हे पीक सहा महिन्यांत उत्पादन देणारे आहे, तसेच शेवग्याच्या एका झाडापासून 35 ते 40 किलो शेंगा विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. शेवग्याचे एक झाड हे आठ ते दहा वर्षे उत्पादन देऊ शकते. तर, पपईचे झाडदेखील शेतकर्‍यांना चांगले उतपादन देऊ शकते, याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कर्जत तालुक्यातील तब्बल सव्वा तीन किलोचा बटाटा पिकविणारे लाखरण येथील शेतकरी सूर्यकांत भिसे, तीन किलो वजनाची पपई पिकविणारे शेतकरी विठ्ठल भोईर, केळीची बाग फुलविणारे भालिवडी येथील शेतकरी अशोक पाटील आदींसह अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version