कृषी संचालक अंकुश माने यांचे गौरवोद्गार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातून वेगवेगळी उत्पादने घेण्यास केलेली सुरुवात क्रांतिकारक आहे. आज कर्जत तालुका प्रगतशील शेतीसाठी ओळखला जाऊ लागला आहे हा बदल निश्चितच स्वागतार्ह असल्याची गौरवोद्गार कृषी विभागाचे कोकण विभागीय अधीक्षक संचालक अंकुश माने यांनी काढले.
कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतीची पाहणी विभागीय कृषी अधीक्षक संचालकी अंकुश माने यांनी केली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अंकुश माने आणि कृषी विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. त्यात शेत तलाव पासून विविध जातीची फुलझाडे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्श्नन करताना कृषी अधीक्षक संचालक माने यांने शेतीमध्ये केलेल्या बदलाचे कौतुक करतानाच शेतीमधून निघणारे उत्पादन याला बाजारभाव मिळवून देण्यासाठी कृषी विभाग मदत करेल असे आश्वासन माने यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. त्याचवेळी कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना परक्षित असलेले मार्गदर्शन देण्यासाठी सतत शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या पिकांची पाहणी करावी अशी सूचना देखील कृषी अधीक्षक सांचालक अंकुश माने यांनी दिली.
यावेळी विभागीय कृषी संचालक कोकण विभाग ठाणे अधिक्षक अंकुश माने, कृषि अधिकारी विभागीय कृषि संचालक, बालाजी ताटे, प्रशासन अधिकारी अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, उपविभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी कर्जत अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेश कोळी, मंगेश गलांडे कृषी पर्यवेक्षक नेरळ सचिन केणे कृषी पर्यवेक्षक कळंब सुदर्शन वायसे कृषी पर्यवेक्षक कर्जत.,दत्तू देवकाते, कृषी सहाय्यक खांडपे राजश्री तायडे कृषी सहाय्यक दहिवली तर्फे निड, स्वाती गावडे कृषी सहाय्यक भोईरवाडी, श्रद्धा देवकर कृषी सहाय्यक पळसदरी, अनिल रुपनवर कृषी सहाय्यक कळंब, व समवेत लाभार्थी शेतकरी तसेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा प्रगतीशील शेतकरी अजित पाटील आणि विनय वेखंडे तसेच शेतकरी उपस्थित होते.