ताडगाव ते कोडबेवाडी रत्स्याचा सर्व्हे पूर्ण
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुधागड तालुक्यातील ताडगांव ग्रामपंचायत मधील कोडबेवाडी आदिवासी वाडीमध्ये पंतप्रधान सडक योजने अंतर्गत प्रथमच ताडगाव ते कोडबेवाडी हा रस्ता होणार आहे. नुकतेच या रस्त्याचा सर्व्हे ताडगांव सरपंच करुणा साठे यांच्या प्रयत्नातून करण्यात आला.
या रस्त्याचा सर्व्हे करताना गावचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय देशमुख, माजी सरपंच छब्या जाधव व केतन साठे उपस्थित होते. ताडगाव ग्रामपंचायत सरपंच करुणा साठे, उपसरपंच संजय चौधरी, सदस्य मंगेश देशमुख, अनंत धायगुडे ,अरुणा वारगुडे, विठी जाधव, मिनी खताळ, देवकी वाघमारे आणि सर्व ग्रामस्थांनी रस्ता होणार म्हणून आनंद व्यक्त केला आहे. या रत्स्याचे काम येत्या मे महिन्याच्या आत पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असून यासाठी पाठपुरावा करू असे सरपंच करुणा साठे यांनी सांगितले. आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र देशमुख, सरपंच करुणा साठे व सरकारी अधिकारी यांचे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांनी आभार मानले