पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन

जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांची उपस्थिती
| माथेरान | वार्ताहर |

कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्व नागरी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून डॉ. श्री. सोपान शिंदे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन व आढावा सभा दि. 28 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय येथे पार पडली.

डॉ. शिंदे जिल्हा यांनी उपस्थित पतसंस्थांचे अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 12 ऑगस्ट रोजी आर्थिक साक्षरता उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली. सदर उपक्रमांतर्गत सर्व पतसंस्थांनी 12 ऑगस्ट रोजी अर्थसाक्षरता विषय शिबीर कार्यक्रम आयोजित करून ठेवीदारांना सभासदांना बचत व काटकसर यांचे महत्त्व सांगायचे आहे वन खात्याचे जे विविध मार्ग आहेत त्याच्याबद्दल माहिती द्यावयाचे आहे, अशी सूचना केली
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण आपल्या कार्यालयावर भाड्याचे घर असो मालकीचे असो तसेच आपले राहते घर असो आपण स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारणी करावयाची आहे घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावे याची आवश्यकता नाही मात्र कार्यालयांना या संबंधित ध्वजसंहिता पाळावी लागेल असे आवाहन केले.

या सभेस कर्जत तालुक्याचे सहाय्यक निबंधक बालाजी कटकदौंड, खालापूर तालुक्याचे सहाय्यक निबंधक सुनील कुलकर्णी तसेच श्याम कपोते लेखापरीक्षक श्रेणी-2, सुनील दांगट सरकारी अधिकारी श्रेणी 2, प्रदीप घुसळे, ऊप लेखापरीक्षक तसेच कर्जत तालुक्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version