| पोयनाड | वार्ताहर |
आपत्तीकाळात घ्यावयाची खबरदारीबाबत आदिवासी आश्रम शाळा कोळघर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजितत करण्यात आला होता. यावेळी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील, अॅड. रेश्मा पाटील, पोलीस उपनिरीक्षक पवार, शाळेचे मुख्याध्यापक आर जी पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचा लाभ 444 विद्यार्थी 16 शिक्षक कर्मचारी,यांनी घेतला.मदत आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे यांनी केली. सूत्रसंचालन मिलिंद पाटील सरांनी केले तर आभार प्रदर्शन एन.डी. पवार सरांनी मांनले.
कोळघर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
