। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील पुरस्कृत, श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज संस्था अलिबागच्यावतीने आधुनिक हेअर कटींग मार्गदर्शन शिबीर व सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सुप्रसिद्ध हेअर डिझायनर उदय टक्के व सौंदर्य तज्ज्ञ हर्षदा टक्के यांचे प्रात्यक्षिकांसहित मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील मॅप आयव्ही हॉटेलमधील सभागृहात सोमवारी (दि.23) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम सुरु होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.