गिलकडे गुजरात टायटन्सचा धुरा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गुजरात टायन्सला पहिल्याच हंगामात विजेतेपदापर्यंत पोहोचवणारा हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. रविवारी (दि. 26) रात्री उशिरा घडलेल्या घडामोडीनुसार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही फ्रेंचायजींच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये गेल्यामुळे आता गुजरातचे नेतृत्व युवा शुभमन गिलच्या हातात जाण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलकडे जर गुजरात टायटन्सचे नेतृत्व आले, तर तो भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांच्या रेसमध्येदेखील दाखल होणार आहे. रोहित शर्मानंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार कोण याची चाचपणी बीसीसीआय नक्कीच करत असेल. जर शुभमन गिलने आपले नेतृत्वगुण दाखून दिले, तर त्याच्याकडे देखील एक सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.

Exit mobile version