गुळसुंदे ग्रामस्थांचा कोकण भवनावर मोर्चा

| आपटा | वार्ताहर |

पनवेल तालुक्यामधील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी व इतर गावकर्‍यांची फसवणूक करून त्यांना पाताळगंगा नदीचे प्रदूषित पाणी पाजून जीवाशी खेळणार्‍या पनवेल पं.स.चे अकार्यक्षम गटविकास अधिकारी व रा.जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पनवेलचे उप अभियंता यांचेवर सेवा हमी कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी (दि. 11) कोकण भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

एम.आय.डी.सी.चे थकीत पाणी बिल न भरता ग्राम निधीचा गैरवापर करणार्‍या तुराडे, वावेघर व गुळसुंदे ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्यांची पनवेल प्रांतांनी केलेल्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधी पदे रद्द करण्यात यावी, गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांवर राबविण्यात आलेल्या नळ जोडणी योजनेच्या कामांची चौकशी करण्यात यावी. आश्‍वासित केलेप्रमाणे एम आयडीसीकडून नवीन (वॉटर टॅपिंग) जोडणी घेऊन मंजूर जल जीवन मिशन योजना तात्काळ कार्यान्वित करून गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी व इतर ग्रामस्थांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. ह्या मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व ग्रामस्थ लाडविली यांच्यावतीने हा मोर्चा निघणार आहे.

Exit mobile version