रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार

| मुंबई | प्रतिनिधी |

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर शनिवारी (दि.31) रात्री उशिरा गोळीबार झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड हादरले आहे. 2025 मध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा एकदा असा प्रकार घडून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर चार राउंड फायर केल्याचे आवाज ऐकू आले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने मदतीला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. संबंधित चार जणं देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बॉलिवूड कलाकार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्मात्यांच्या संरक्षणासाठी सरकार काही उपाययोजना करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version