। पनवेल । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाची सुत्रे नुकतीच मावळते अध्यक्ष हर्मेश तन्ना यांचेकडून गुरुदेव सिंग कोहली यांनी एका शानदार समारंभात स्विकारली. प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदग्रहण सोहळ्यास सहाय्यक प्रांतपाल मधुकर नाईक , ट्रस्ट चेअरमन डॉ. एन. सी. जनार्दन, ट्रस्ट सेक्रेटरी सैफुद्दीन व्होरा, सुधीर कांडपिळे, डॉ. प्रमोद गांधी, अरविंद सावळेकर आदि मान्यवरांसह समाजातील प्रतिष्ठीत नागरिक आणि बहुसंख्य रोटेरियन्स व अॅन्स उपस्थित होते.
यावेळी माजी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, नूतन अध्यक्ष गुरुदेव सिंग कोहलीयांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष – गुरुदेव सिंग कोहली, सेक्रेटरी – विनोद गुर्मे, खजिनदार – मधुसुदन मालपाणी, जॉईंट सेक्रेटरी – निलेश पोटे, आयपीपी- हर्मेश तन्ना, भावी अध्यक्ष कल्पेश परमार, भावी अध्यक्ष- डॉ. जय भंडारकर, व्हाइस प्रेसिडेंट – अरविंद सावळेकर, डायरेक्टर क्लब अॅडमिन/ न्यु जनरेशन – डॉ. जय भंडारकर, डायरेक्टर मेंमबरशीप- चारुदत्त भगत, डायरेक्टर ः सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल – डॉ. प्रकाश पाटील, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल – सलिम अफसर, डायरेक्टर व्होकेशनल – सुहास मराठे, डायरेक्टर रोटरी फाऊंडेशन/ट्रेनर – विष्णू म्हात्रे, डायरेक्टर पब्लिक इमेज- डॉ. नितीन शितुत, आयटी ऑफीसर- डॉ. रोहित जाधव, चेअरमन सिनर्जी – डॉ. किशोर सोलंकी, चेअरमन स्टेवॉर्डशीप अँड ग्लोबल ग्रँट – श्रीनिवास कोडूरू, बुलेटिन एडिटर- तुषार तटकरी, चेअरमन मेडिकल प्रोजेक्ट – डॉ. सुरेश कारंडे, चेअरमन नॉन-मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्ट /विन्स – लतिफ शेख, चेअरमन प्रोग्राम – संजय जैन, चेअरमन लिट्रसी – सुनिल बोराडे, चेअरमन इन्व्हायरमेन्ट – अलिअसगर गोलवाला, चेअरमन फंडरायझिंग – किशोर चौधरी, चेअरमन अटेंडन्स – भावेश रंगपरिया, चेअरमन ह्युमन डेव्हलपमेन्ट – राजेश नोटनानी, चेअरमन फेलोशिप- निलेश पोटे, चेअरमन स्पोर्टस् अतुल भगत, या पदग्रहण सोहळ्याचे सुत्रसंचालन डॉ. रोहित जाधव यांनी केले. भावी अध्यक्ष डॉ. जय भंडारकर यांनी आभार प्रदर्शन केले.