स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथे स्वामी समर्थ मठात रविवारी (दि. 21 जुलै) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सुधाकर घरत, अवधूत घरत, श्री स्वामी समर्थ सेवक व भक्त परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आगरी समाज हॉल येथे करण्यात आली आहे.

यावेळी पहाटे 5.30 वाजता श्रींची काकड आरती, सकाळी 7.30 वाजता नित्य नैमित्तीक पूजा प्रसाद, सकाळी 8.30 वाजता लघुरुद्र पूजा, दुपारी 12 वाजता श्रींची आरती व प्रसाद, दुपारी 12.30 वाजता श्री दत्तगायत्री होमहवन, दुपारी 1 वाजता श्री सद्गुरु पाद्यपूजा, सायंकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे भजन, सायंकाळी 5 वाजता गुरुवर्य सुधाकर घरत यांचे प्रवचन, सायंकाळी 6.30 वाजता श्री स्वामींची महाआरती, रात्री 7.30 वाजता महाप्रसाद, रात्री 8 वाजता गुरूमंत्र प्रदान कार्यक्रम व रात्री 11 वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या भजनाने उत्सवाची सांगता होईल.

Exit mobile version