रसायनीमध्ये गुटखा विक्री तेजीत

लाखोंची उलाढाल, प्रशासन सुस्त

| रसायनी | वार्ताहर |

काही दिवसांपूर्वी गुटखा विक्री करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाने धाड टाकून गुटखा जप्त केला होता, त्यामुळे काही काळ व्यवसाय पूर्ण बंद होता. आता प्रकरण शांत झाल्याबरोबर पुन्हा गुटखा विक्रेत्याने चांगलाच जोर मारला असल्याचे पहायला मिळत आहे. रसायनीसह मोहोपाडा शहरात तसेच आसपासच्या परिसरात पानटपरीवर अल्पवयीन मुलांना व तरुणांना पुडीत बांधून किंवा गुंडाळून गुटखा दिला जातो.

मोहोपाडा येथे तर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. गुटखा बंदीला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी मोहोपाड्यात मात्र रोजरोसपणे तेजीत विक्री सुरू आहे. यावर अन्न-औषध प्रशासनाची अथवा पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. मोहोपाडा शहराच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्‍नाचे ठाम उत्तर दहा वर्षांत कोणताही अधिकारी देऊ शकला नाही. कारवाई न करता सुरु असलेल्या गुटखा, मावा विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधीत असल्याचेही चित्र आहे.

Exit mobile version