खांदा कॉलनीत गुटखा जप्त

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
खांदा कॉलनी, सेक्टर 9 येथील गाळ्यातुन 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा गुन्हे शाखा कक्ष 3 ने जप्त केला आहे. या प्रकरणी हरी दौलत बुंधे व रहमान यांच्या विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील गाळ्यामध्ये सुगंधित सुपारी व सुगंधित पान मसाला विक्रीकरता साठवणूक करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पोलिसांनी सापळा रचून गाळ्यात धाड टाकून झडती घेतली असता दोन लाख 52 हजार रुपये किंमतीचा गुटखा सापडून आला.

Exit mobile version